Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

“मावळच्या विकासाला गती देण्यासाठी पुण्यात निर्णायक बैठक; आमदार सुनील शेळकेंची ठाम भूमिका”

DPDC: उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांची पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक

पुणे : पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील कौंसिल हॉल येथे आज जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच नागरिकांच्या हिताच्या योजनांना गती देण्याची ठाम मागणी केली. ग्रामीण व शहरी भागासह कॅंटोन्मेंट बोर्डाचा समावेश असलेल्या मावळ तालुक्याच्या विशेष परिस्थितीचा विचार करून या भागासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठोस मागणी त्यांनी मांडली.
तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारी सर्व विकासकामे व साहित्य पुरवठा दर्जेदार असावा, यासाठी ठेकेदारांवर कडक नियंत्रण ठेवावे, अशीही भूमिका आमदार शेळके यांनी मांडली. निकृष्ट कामे व गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर देखरेख ठेवावी, यावर त्यांनी भर दिला.

मावळच्या विकासाला गती…

या बैठकीत मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे मावळ तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button