Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मेट्रो सेवेतील आजच्या नियमात केला बदल

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन सध्या होणार नाही.

या कारणास्तव 26 सप्टेंबर 2024 रोजी मेट्रो प्रवासी सेवेसाठी जाहीर केलेले बदल रद्द करण्यात आले आहेत. मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. परंतु जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन दरम्यानची प्रवासी सेवा यावेळी चालू राहणार नाही.

हेही वाचा   –    ‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील’; बच्चू कडू यांचं विधान 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन गुरूवारी होणार होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्टेशन पाच तास प्रवासांसाठी बंद ठेवण्यात येणार होते.

तर सायंकाळी सात नंतर हे स्टेशन प्रवाशांसाठी खुले केले जाणार होते. परंतु पुणे शहरातील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर मेट्रो सेवा प्रवाशांसाठी नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button