खासदार संजय राऊतांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड

Sanjay Raut | भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे.
मीरा भाईंदर शहरामध्ये १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती. त्यातील १६ शौचालय बांधण्याचा कंत्राट भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानाला मिळालं होतं. त्यामध्ये बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यावर आता कोर्टाने संजय राऊतांना शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा – ‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील’; बच्चू कडू यांचं विधान
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्या आरोप केला होता. त्यानंतर आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना दिले होते. त्यानंतर मेधा सोमय्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर कोर्टाने आता संजय राऊतांना त्यावर कोर्टाने शिक्षा दिली आहे. या प्रकरणानंतर संजय राऊत आता जामीनासाठी पुढच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे.





