Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPLमध्ये RCBच्या तिकीटांचा काळाबाजार; कँटीन कर्मचाऱ्याला अटक, एका तिकीटाची किंमत किती?

IPL Ticket Black Market: IPL 2026च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) तिकीटांचा काळाबाजार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम मध्येच हा प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे.

स्टेडियममधील ‘श्री लक्ष्मी कँटीन’मध्ये काम करणारा चंद्रशेखर नावाचा कर्मचारी RCB विरुद्ध Lucknow Super Giants सामन्याची तिकीटं काळ्या बाजारात विकत होता. ही तिकीटं मूळ किमतीपेक्षा खूप जास्त दराने सुमारे ₹15,000 ते ₹19,000 विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी चंद्रशेखरला अटक केली. त्याच्याकडून जवळपास 100 तिकीटं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सेंट्रल क्राइम ब्रांचकडून सुरू आहे.

चौकशीदरम्यान चंद्रशेखरने सांगितलं की, ही तिकीटं त्याला Karnataka State Cricket Association शी संबंधित गणेश परीक्षित नावाच्या व्यक्तीकडून मिळाली होती. जास्त नफा मिळवण्यासाठी ही तिकीटं महागात विकण्यास सांगितलं होतं, असा आरोप आहे.सध्या गणेश परीक्षित फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा –  जर तुम्ही दररोज हे 8 सुपरफूड्स खाल्ले तर रहाल स्लिम आणि फिट

या प्रकरणात काही खासगी कंपन्यांच्या संचालकांवरही तिकीटांच्या बेकायदेशीर विक्रीत सहभाग असल्याचा संशय आहे. याबाबत FIR नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये IPL तिकीटांबाबत आधीपासूनच वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांना प्रत्येकी तीन तिकीट देण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर विरोधकांनी टीका करत, सामान्य प्रेक्षकांना तिकीट मिळणं अधिक कठीण होईल, असं म्हटलं होतं.

मैदानावर मात्र RCB चा खेळ जोरात आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 4 सामने त्यांनी जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यावर त्यांनी विजय मिळवला, तर एकमेव पराभव राजस्थान रॉयल्स विरुद्ध झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button