ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात आधुनिक क्रीडा सुविधांसाठी प्रयत्नशील !

महापौर रवी लांडगे : मोहननगर येथील जलतरण तलावाचे लोकार्पण

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त क्रीडा सुविधा देण्याचा त्याचबरोबर क्रीडा साधने आधुनिक व दर्जेदार करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,मोहननगर येथील जलतरण तलावाचे नूतनीकरण हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे नागरिकांना आणि खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होतील, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले,या कामाचा लोकार्पण सोहळा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला,त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे,शंकर जगताप यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य प्रमोद कुटे, धर्मपाल तंतरपाळे,नगरसदस्या वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह उपायुक्त पंकज पाटील, अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा –  कोणाचीही खैर नाही! राज्यातील गंभीर प्रकरणांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा; पोलिसांना दिले हे कडक निर्देश

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम २० जून २०२४ पासून सुरू झाले होते त्यामध्ये जलतरण तलावाची खोली कमी करणे, तलाव आच्छादित करणे, वॉटरप्रूफिंग, नवीन फ्लोरिंग, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण, अंतर्गत सुशोभीकरण, विद्युत विषयक कामे, आधुनिक फिल्टरेशन प्लँट बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच रंगरंगोटी अशी विविध कामे करण्यात आली आहेत,यासाठी सुमारे र.रू.३ कोटी ९१ लाख इतका खर्च आलेला आहे. या सर्व कामांमुळे जलतरण तलाव अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक बनला असून, नागरिकांना आणि खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती उप आयुक्त पंकज पाटील यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज पाटील यांनी,सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार वैशाली काळभोर यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

महानगरपालिकेकडून क्रीडा क्षेत्रासाठी उभारण्यात येणाऱ्या अशा सुविधा या केवळ पायाभूत कामे नसून, त्या शहराच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठीची गुंतवणूक आहेत. मोहननगर जलतरण तलावाचे नूतनीकरण ही त्याचीच प्रचिती असून, या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून स्थानिक खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी.

– आण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा.

शहरात दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. मोहननगर जलतरण तलावाच्या नूतनीकरणामुळे नागरिकांना आणि विशेषतः महिलांना सुरक्षित व आधुनिक वातावरणात सराव करण्याची संधी मिळणार आहे. या सुविधांचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.

– उमा खापरे, आमदार, विधान परिषद.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button