कामात कुचराई केल्यास कारवाई; महसूलमंत्र्यांचा पुण्यातील कामचुकार अधिकाऱ्यांना इशारा
पुणेः राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच जिल्ह्यांची आढवा बैठक घेतली. या आढावा बैठकीत महसूल वसुलीचे धोरण साध्य करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच उद्दीष्ट साध्य करण्याकडे लक्ष द्यावे, अधिकाअधिक वसूली करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली तर कारवाई करण्यात येईल, अशा कडक शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.
महसूल वसुलीचे प्रत्येक जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अधिकाधिक वसुली करण्यात यावी. महसूल वाढीसाठी काही नाविन्यपूर्ण योजना असतील तर त्याचा विचार केला जाईल, चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जाईल तर कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना एकदा सुधारण्याची संधी देण्यात येईल. बदल नाहीच झाला, तर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी बावनकुळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.
हेही वाचा – संयम व सहनशक्तीची अपूर्व देणगी राजकारणाने मला दिली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ही आढावा बैठक शुक्रवारी पुणे विभागीय कार्यालयात पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर आयुक्त कविता द्विवेदी, अपर आयुक्त समीक्षा चंद्रकार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्यासह चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.
मागच्या सरकारच्या काळात महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील असताना वाळू बाबात काही धोरणात्मक निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतले होते. वाळूचे दरही कमी करून ती ग्राहकांना देली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, काही वाळू ग्राहकांना कमी दरात खरेदी देखील केली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने नवीन वाळू धोरणाबाबात अभ्यास सुरू केला आहे. या आराखड्याचा मुसदा झाल्यावर नागरिकांकडून हकरती आणि सूचना मागवण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.