बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, काय मागण्या मान्य झाल्या ते पाहा ..

मुंबई : बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीच्या तीन दिवसांपासून केलेले काम बंद आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले आहे. बेस्टच्या आजी – माजी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल होत होते. अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने बेस्ट कृती समितीच्या मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कृती समितीच्या वतीने संप मागे घेतला जात आहे थोड्याच वेळात पहिली बस धावेल असे आमदार सचिन अहिर यांनी जाहीर केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेस्ट कृती समिती सोबत केलेल्या तासभरच्या बैठकी नंतर आज अखेर तिसऱ्या दिवशी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. बेस्टच्या माजी आणि आजी कर्मचाऱ्यांच्या १२ संघटनांनी गुरुवारी रात्री पासून कामबंद करुन संप पुकाराला होता.
बेस्टचा वेतन करार होईपर्यंत जे कायम कर्मचारी आहेत त्यांना तीन हजार आणि Contract कामगारांना दरमहा २ हजार हंगामी वाढ देण्यात येणार ( वेतनवाढ) देण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. बेस्ट कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘देशाच्या आर्थिक, सामरिक प्रभावासाठी ‘मजबूत सागरी क्षमता’ निर्णायक’; पंतप्रधान नरेंद्र मोदी
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही दोन दिवस बेस्ट समिती सोबत संपर्कात होतो. या वर्षीच्या आर्थिक बजेट वापरून या वर्षाची ग्रॅज्युईटी दिली जाणार ही प्रमुख मागणी मान्य करण्यात आले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना चांगले कँटीन , वॉशरूम देण्यात येणार आहे. पालिकेच्या मदतीने बेस्ट स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच बेस्टचा महसुल वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये वाढ
वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ
कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा होणार
कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचा तसेच नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले.
बेस्ट बस सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांनी दिले. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५००० नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद नियोजित पद्धतीने करण्याचे निर्देश यावेळी दिले.
याशिवाय, नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाने तयार केलेला ‘कायापालट’ प्रस्ताव तातडीने शासनास सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बेस्ट ही मुंबईकरांची लाईफलाईन असून, ती सक्षम करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.





