TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

पुणे : म्हाडाच्या संगणकीय सोडतीस 20 ऑक्‍टोंबरपर्यंत मुदतवाढ

नागरिकांचा अल्प प्रतिसाद : प्रशासनाची पुन्हा तयारी

पिंपरी : म्हाडाच्या वतीने आयोजित संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. किचकट अटी शर्ती मुळे नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी म्हाडाच्या पुणे गहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने संगणकीय सोडतीस ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 20 ऑक्‍टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध नवीन वेळापत्रकानुसार पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 9 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आजपर्यंत सुमारे 32 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदतीची नागरिकांनी केलेली मागणी विचारात घेऊन पुणे मंडळाने सोडतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 20 ऑक्‍टोंबरपर्यंत नागरिकांना म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 3 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

म्हाडाच्या उपलब्ध सदनिका –

१) पुणे, पिंपरी-चिंचवड – 5425
२) कोल्हापूर – 337
३) सांगली – 32
४) सोलापूर – 69

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button