breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरबा खेळण्यावर प्रशासनाचे निर्बंध कायम; गरब्याचे छुप्या पद्धतीने आयोजन करणारे पोलिसांच्या रडारवर

यंदा नवरात्रोत्सवावर देखील कोरोनाचं सावटं आहे. नवरात्रोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला तरी यंदा दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाची धामधूम दिसत नाहीये. पारंपारिक मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी असली तरी गरबा खेळण्यावर प्रशासनाचे निर्बंध कायम आहेत.

नवरात्रोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला तरी यंदा दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाची धामधूम दिसत नाही. पारंपारिक मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी असली तरी गरबा खेळण्यावर प्रशासनाचे निर्बंध कायम आहेत. नियम मोडून गृह संकुलांच्या आवारात गरब्याचे छुप्या पद्धतीने आयोजन करणारे पोलिसांच्या रडारवर असतील. त्यासाठी झोन चार मधील पोलिस अधिकाऱ्यांनी पथके सज्ज केली आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉक डाउनमुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. नवरात्रोत्सव आणि गरब्याचा मुंबई आणि उपनगरांत वेगळाच उत्साह असतो. मात्र, लॉकडाउनमधून मिळालेली शिथिलता पाहता नवरात्रोत्सवात नागरिक एकत्र आल्यास गणेशोत्सवानंतर आलेल्या करोना लाटेसारखी लाट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा यावेळी अधिक सतर्क आहे.

सार्वजनिक मंडळे सामाजिक जबाबदारी जपताना दिसत असली तरी शहरातील शेकडो लहान, मोठ्या गृह संकुलांनी सामाजिक भान जपून यंदा साधेपणाने उत्सव करणे अपेक्षित आहे. करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी गृह संकुलाच्या आवारातील गरब्याला बंदी असून गृह संकुलांत करोनाचे निर्देश तोडून गरब्याचे आयोजन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलिस आयुक्त विनायक नराळे यांनी दिला आहे. तसेच डीजे, साऊंड आणि ढोल पथकांनाही याबाबत बजावण्यात आले असल्याचेही नराळे यांनी सांगितले. नियमांकडे दुर्लक्ष करून करोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्ती तसेच गरब्याचे नियमबाह्य आयोजन करणारी गृह संकुले यांबाबत सतर्क नागरिकांनीही थेट पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन नराळे यांनी केले आहे.

अंबरनाथ, बदलापूरमधील अनेक नामवंत आणि पारंपारिक सार्वजनिक मित्र मंडळांनी साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी अंबरनाथ पश्चिम भागातील खुंटवली येथील जय भवानी सार्वजनिक मित्र मंडळाच्या गरब्याचे वेगळेच आकर्षण असते. ३३ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच हा गरबा बंद राहणार असल्याचे या मंडळाचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी सांगितले. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव पाहता, केवळ मंदिरात पूजा करूत उत्सव साजरा केला जाणार आहे. नागरिकांसाठी ऑनलाइन गरब्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असून रोज गरब्याचे चित्रीकरण पाठवून उत्तम गरबा सादर करणाऱ्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही घरपोच पारितोषिक पाठवले जाणार असल्याचेही वाळेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button