breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Whatsapp ने नुकत्याच लाँच केलेल्या चॅनल फिचरमध्ये अनफॉलो कसे करायचे?

Whatsapp : मेटा ची पॅरेंट कंपनी असणारे whatsapp कायमच नवीन फीचर्स लाँच करत असते. अशातच whatsapp ने आपल्या युजर्ससाठी चॅनल हे नवीन फिचर नुकतेच लाँच केले आहे. आणि हे फिचर युजर्सच्याही पसंतीस उतरताना दिसत आहे. आपली खासगी माहिती समोरच्याला न दिसत आपण त्याच्याशी चॅनलच्या माध्यमातून संपर्कात राहू शकतो. यामुळे यूजर्सचा याकडे वाढता कल दिसून येतोय.

चॅनल फिचर वापरण्यासाठी एवढे सोपे आहे की तुम्ही सहजरित्या कोणत्याही चॅनलला सर्च करून फॉलो करू शकता. तसेच कंपनीने चॅनल अनफॉलो करण्याची सुविधा देखील दिली आहे. जेणेकरून एखाद्या चॅनलचे कंटेल तुम्हाला आवडले नाही किंवा पुन्हा तुम्हाला ते पाहायचे नसल्यास तुम्ही त्या संबंधित चॅनलला अनफॉलो देखील करू शकता. अनफॉलो केल्यानंतर संबंधित चॅनलचे कोणतेही अपडेट तुम्हाला दिसणार नाही.

हेही वाचा – ‘लंडनमधील वाघ नखे शिवाजी महाराजांची नाहीत’; इंद्रजित सावंत यांचं विधान

या सोप्या पद्धतीने करा whatsapp चॅनल अनफॉलो

  1. यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या फोनमध्ये whatsapp आपण करावे लागेल.
  2. whatsapp ओपन झाल्यानंतर तेथे दिसणाऱ्या अपडेट्स टॅबवर तुम्हला क्लिक करावे लागेल.
  3. त्यानंतर तुम्हाला जे चॅनल अनफॉलो करायचे आहे ते ओपन करा.
  4. चॅनल ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला वर दिसणाऱ्या ३ डॉटवर क्लिक करा.
  5. त्यानंतर समोर दिसणारे अनफॉलो ऑप्शन निवडा.
  6. अनफॉलो ऑप्शनवर क्लिक करून कन्फर्म करा.
  7. अशा प्रकारे तुम्हाला अनफॉलो करायचे आहे ते चॅनल अनफॉलो होईल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button