breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मुंबईचा कायापालट करण्याची सुरुवात झाली आहे”; पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भाषणातले ठळक मुद्दे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानात आज जंगी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलतान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठीतून भाषणाला सुरुवात! ‘मुंबईतील माझ्या सर्व बंधु आणि भगिनींना माझा नमस्कार’ असं मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या आजच्या भाषणातले ठळक मुद्दे :

भारत आज एका नवीन कालखंडात प्रवेश करतोय, नाहीतर गेल्या शतकातला एक मोठा कालखंड फक्त गरिबीची चर्चा करण्यातच, फक्त इकडून-तिकडून मदत मागून गुजराण करण्यातच गेला.
आज भारताबद्दल जगात सकारात्मकता आहे, कारण आपण पूरेपूर सामर्थ्याने काम करतोय.
ज्या प्रकारच्या आधुनिक पायाभूत सुविधांची पूर्वी कल्पना व्हायची, तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आज बनतंय.
येत्या 25 वर्षांत महाराष्ट्रातील अनेक शहरं देशाच्या प्रगतीला गती देतील, मुंबईला भविष्यासाठी तयार करण्याला डबल इंजिन सरकारचं प्राधान्य.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपा आणि रालोआचं सरकार कधीही विकासकामांना स्थगिती देत नाही. मधल्या काळात राज्यात दुहेरी सरकार नसल्यामुळे अनेक विकासकामं रखडली याचा फटका सामान्य नागरिकांना बसला.
विकासासाठी दिल्ली ते महाराष्ट्र ते मुंबई एकच सरकार पाहिजे.
आधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील, मुंबईच्या हक्कांचे पैसे विकासकामांसाठी सत्कारणी लागले पाहिजे.
आज आम्ही देशातील शहरांच्या संपूर्ण परिवर्तनासाठी काम करत आहोत. इलेक्ट्रिक वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात भर देत आहोत.
मुंबईसारख्या शहराला प्रगतीपथावर नेताना स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे.
केवळ राज्य सरकारकडून वेगानं काम करून जर खाली पैसा योग्य ठिकाणी पोहोचणार नसेल, केवळ बँकात खितपत पडणार असेल तर मुंबईचा विकास कसा होईल?
मुंबईचा कायापालट करण्याची सुरुवात झाली आहे.
देशातल्या प्रत्येक शहरामध्ये मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी उभारणार अनेक पायाभूत प्रकल्प मुंबईला नवं सामर्थ्य देत आहेत.
देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागली आहेत.
रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. यात मुंबई लोकल आणि अन्य रेल्वे पायाभूत सुविधांचाही विकास केला जाणार.
येत्या २५ वर्षात महाराष्ट्रातील अनेक शहरं देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणार आहेत. राज्यात दुहेरी इंजिन सरकार येताच रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रबळ होत असून आज भारत भविष्यवादी दृष्टिकोन आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून वाटचाल करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button