TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘युवा वॉरियर्स’ कार्य अहवालाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रकाशन

पिंपरी । प्रतिनिधी

१८ ते २५ वयोगटातील युवकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत पक्षाशी जोडणाऱ्या युवा वॉरियर्स उपक्रमाच्या अहवालाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांच्या निवास स्थानी नुकतेच करण्यात आले. तसेच हा उपक्रम भविष्यात सुरु ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.अल्पावधीतच या उपक्रमाला युवावर्गाची पोचपावती मिळाल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
१८ ते २५ वयोगटातील युवकांची आवड जाणून घेऊन त्यांना त्यात प्रोत्साहन देण्यासाठी युवा वॉरियर्स ही संकल्पना गेल्या वर्षी १९ फेब्रुवारीला सुरु करण्यात आली. युवकांच्या कलागुणांना वाव देत त्यांना पक्षाशी जोडण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. त्याअंतर्गत शहरी भागात प्रत्येक वॉर्डात,तर ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुका पंचायत गणात युवा वॉरियर्सची शाखा उघडण्याचे उद्दिष्ट आहे. सिंहगड किल्याच्या पायथ्यापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यात आतापर्यंत राज्यभर ६८ जिल्ह्यांपैकी ६५ जिल्ह्यांमध्ये प्रवास करून शेकडो शाखा उघ़डून १८ ते २५ वयोगटातील ४० हजार युवक पक्षाशी जोडण्यात आले असल्याचे युवा वॉरियर्स प्रदेश संयोजक अनुप मोरे यांनी सांगितले या साठी भाजपा प्रदेश सरचिटणीस ,आमदार म.श्री.चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे .
तसेच गेल्या वर्षभरात युवा वॉरियर्समार्फत युवा जोडण्याच्या केलेल्या या कामाचा अहवाल नुकताच पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात आला. त्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अनुप मोरे,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील,प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे , युवा वॉरियर्स पश्चिम महाराष्ट्र संयोजक तुषार हिंगे,सह संयोजक अमृत मारणे तसेच प्रदेश पदाधिकारी निखिल चव्हाण ,अक्षय नलावडे,योगेश मैंद,पंडित भुजबळ आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button