breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

प्रजासत्ताकदिनी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा

नवी दिल्ली – दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताकदिनी मोठा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात विविध राज्यातील चित्ररथाचं संचलन होतं. विविध राज्येही आपआपल्या राज्याची ओळख या चित्ररथातून करून देत असतो. यंदा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथावर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळतेय.

वाचा :-रतन टाटांच्या माणुसकीचे दर्शन, आजारी माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी थेट पुण्यात

यंदा राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा साकारला जाणार आहे. या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळणार आहे. अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसणार आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा यंदाच्या चित्ररथावर साकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

2020 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही

मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झाला नव्हता. 2020 च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीचती 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता. पण तो नाकारण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचाही प्रस्ताव नाकारला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button