Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘एसआयआर’चा दुसरा टप्पा आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू; 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश

नवी दिल्ली : बिहारमध्ये ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (Special Intensive Revision – SIR) विशेष सघन सुधारणा ची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, आज रात्री 12 वाजल्यापासून देशभरात या प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी याबद्दल माहिती दिली.

पात्र मतदारांचा समावेश, अपात्रांना वगळणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, ‘एसआयआर‘ प्रक्रियेचा मुख्य उद्देश पात्र मतदारांना यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र मतदारांना मतदार यादीतून वगळणे हा आहे. देशात 21 वर्षांपूर्वी म्हणजेच 2003 मध्ये शेवटची ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ झाली होती. त्यामुळे, आता यात बदल करणे आवश्यक आहे

बीएलओ (BLO) घरोघरी जाऊन करणार तपासणी

निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) तीन वेळा प्रत्येक घरी जाऊन मतदारांना भेटतील. ते मतदारांच्या नावांची यादीत पुष्टी करतील आणि नाव जोडण्यासाठी फॉर्म देतील. जे लोक घरी नसतील किंवा दिवसा ऑफिसमध्ये जातात, ते ऑनलाइन आपले नाव जोडू शकतील.

पहिल्या टप्प्यात कोणतेही कागदपत्र नाही

नवीन मतदार यादीत नाव जोडण्यासाठी मतदारांना पहिल्या टप्प्यात कोणतेही कागदपत्र (Documents) देण्याची गरज नाही. त्यांना फक्त 2003 च्या मतदार यादीत त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे नाव होते की नाही, हे सांगावे लागेल. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सर्व राज्यांची 2003 ची मतदार यादी उपलब्ध आहे.

हेही वाचा –  मनसेचा 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा; पदाधिकाऱ्यांना दिले तयारीचे आदेश

मतदान केंद्रांची (Polling Booth) संख्या बदलणार

मतदारांची गर्दी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, आता कोणत्याही बूथवर 1000 पेक्षा जास्त मतदार असू शकणार नाहीत. त्यामुळे, ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांची संख्या देखील बदलणार आहे.

एसआयआर’ प्रक्रिया तीन टप्प्यात

‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण होईल:

पहिल टप्पा: 2003 यादीशी जोडणी –

मतदारांचे नाव 2003 च्या मतदार यादीशी लिंक केले जाईल.

मतदारांना फक्त 2003 मध्ये त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे नाव कोठे होते, हे सांगावे लागेल.

दुसरा टप्पा: नोटीस आणि कागदपत्रे

-ज्या लोकांचे नाव 2003 च्या यादीशी लिंक होऊ शकणार नाही, त्यांना निवडणूक आयोग नोटीस जारी करेल.

-या टप्प्यात मतदारांना संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील. आधार कार्ड देखील स्वीकारले जाईल.

-याशिवाय, 2003 च्या वेळी ते आणि त्यांचे पालक कोठे होते, हे देखील सांगावे लागेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button