Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

Supriya Sule | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. त्याला अटक केली जात नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नसून आम्हाला सुरक्षाही पुरवली नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबीयांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की कोणाला पटतंय का की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही. त्याचा सीडीआर काढा. फोन असा जातो कुठे? कृष्णा आंधळे आणि इतर आरोपींचा सीडीआर मिळालाच पाहिजे. यासाठी आपण लढा लढू. ही लढाई महिलांनी हाती घेतली पाहिजे. घ्या हातात लाटणं. आमच्या घरातील पुरूषावर असे अन्याय करता? हा महाराष्ट्र असं सहन करणार नाही. तुम्ही अन्नत्याग करू नका, ही विनंती करते. वेळ पडली तर आम्ही अन्नत्याग करू.

हेही वाचा  :  पेट्रोल ऐवजी नुसते पाणीच! शहरातील पंपावरील धक्कादायक प्रकार

त्या तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? तो गरीब, शोषित, पीडित आहे म्हणून आवाज नाही का त्याला? जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही, दोन्ही मुलांची जबाबदारी पवारांनी घेतली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी या मुलीला, आईला आणि आजीला शब्द देते की या बीडमधील सर्व मस्ती उतरलीच पाहिजे. सत्तेची आणि पैशांची ही मस्ती आहे. आपण एकत्रपणे ताकदीने लढू. कोर्ट केस मी लढेन. मी जशी राज्यात आणि देशात बिंधास्त फिरते तसं प्रत्येक महिला फिरली पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button