Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन; उदयनराजे भोसले संतापले…
मुंबई |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त के लेला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं आहे. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं आहे. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलेलं आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे.





