मी ईश्वर साक्ष ठेवून….; 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

Vidhan Parishad Members Oath : विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित 10 सदस्यांचा शपथविधी समारंभ 11 वाजता पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्याचे आयोजन विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले होते. नवनिर्वाचित आमदारांना विधानपरिषदेचे समापती राम शिंदे यांनी शपथ दिली. या सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले होते.
या कार्यक्रमाला राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ. निलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिन कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश होता. शपथविधीनंतर सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा – तुमचं काम फटाफट पूर्ण होणार… ७ कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी; EPFO मोठा बदल करण्याच्या तयारीत
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग पाचव्यांदा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या १० आमदारांचा आज १४ मे रोजी पार पडलेल्या शपथविधी कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पंतप्रधान नरेंद मोदी यांना दिलेल्या बचतीच्या आवाहनाला साद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क बुलेटवरून विधीमंडळात दाखल झाले.मुख्यमंत्री स्वतः बुलेट चालवत होते. विशेष म्हणजे, त्यांनी हेल्मेट घालून आणि ट्रॅफिकच्या सर्व नियमांचे पालन करून हा प्रवास पूर्ण केला.





