पेट्रोल ऐवजी नुसते पाणीच! शहरातील पंपावरील धक्कादायक प्रकार

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर अजब प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पंपावर पेट्रोल डिस्पेन्सर मशीनमधून पेट्रोलऐवजी चक्क पाणी वाहनांमध्ये भरल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळं पंपावर पेट्रोल भरल्यानंतर लोकांच्या दुचाक्या आणि चार चाकी वाहनं रस्त्यात मध्येच बंद पडत असल्याचं दिसून आलं, त्यामुळंच खरंतर हा प्रकार समोर आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या भोसले पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे. काही वाहनचालकांनी या पंपावरुन फ्लुएल टँक फुल करुन घेतले, पण काही अंतरावर गेल्यानंतर त्यांची वाहनं अचानक बंद पडली. तसंच एक-दोन लिटर पेट्रोल भरलेल्यांचीही वाहन काही अंतरावरच बंद पडली.
हेही वाचा : ‘ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय आत्मनिर्भरता अशक्य’; केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
यामुळं ज्यांनी फ्युएल टँक फुल केले होते त्यांना आपली वाहनं अक्षरशः उलटी करुन टँकमधून पेट्रोल बाहेर काढलं तर त्यांना अक्षरशः धक्काच बसला. कारण यामध्ये पेट्रोल कमी आणि पाणीच जास्त असल्याचं दिसून आलं. याचं प्रमाणही साधारण ८० टक्के पाणी २० पेट्रोल असं होतं.