कोथरूड येथे २० फेब्रुवारी पासून संत्रा महोत्सवाला सुरुवात

पुणे | पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पनेअंतर्गत गांधी भवन, कोथरूड येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान ‘संत्रा महोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
सत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया ही पणन मंडळाच्या अमरावती व नागपूर विभागीय कार्यालयाकडे करण्यात आलेली असुन यावेळी सुमारे ५० संत्रा उत्पादक सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे २५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हेही वाचा : तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा
या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीकरीता सहाय्यक सरव्यवस्थापक मंगेश कदम 7588022201 यांच्याशी संपर्क साधावा, विदर्भातील उच्च प्रतीच्या नागपूरी संत्रा व इतर उत्पादित पदार्थाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कदम यांनी केले.