Narendra Modi | ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे “सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली”; काँग्रेस नेत्याची टीका

Narendra Modi | ईद निमित्त भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला ‘सौगात-ए-मोदी’ कीट देणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून विरोधकांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्ध सपकाळ यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे “सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली” असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून २००२ या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. भाजपकडून अल्पसंख्याकांना तिकीट देताना, मंत्रीपद देताना दुजाभाव केला जातो. त्यांची मुस्लीमविरोधी वक्तव्ये पाहिल्यानंतर ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.
हेही वाचा : ‘‘बांगलादेश अवैध तरीके से आया और कुदलवाड़ी में घर बसाया..!’’ कुदळवाडीत जोडपे जेरबंद!
ही ‘सौगात’ देत असताना दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, पेट्रोल ४० रुपये तर डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.