Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी नववर्षापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस घेणार देवांचा आशीर्वाद: तुळजापूर, पंढरपूर ते नरसिंहपूरचा दौरा

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, शनिवार, 29 मार्च 2025 रोजी राज्यातील प्रमुख मंदिरांना भेट देणार आहेत. मराठी नववर्षाच्या आधी आणि अमावास्येच्या दिवशी ते तुळजापूर, पंढरपूर आणि नरसिंहपूर येथील मंदिरांतून देवांचा आशीर्वाद घेणार आहेत. या दौऱ्यात ते नरसिंहपूर पोलीस स्टेशनचं उद्घाटनही करणार आहेत. राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळी 9 वाजता मेघदूत निवासस्थानातून सुरू होणारा हा दौरा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोलापूरकडे विमानाने निघेल. सकाळी 10:25 वाजता सोलापूर विमानतळावर उतरल्यानंतर फडणवीस हेलिकॉप्टरने तुळजापूरकडे रवाना होतील. 10:40 वाजता तुळजापूर हेलिपॅडवर आगमन झाल्यावर ते तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी जातील. तिथे 30 मिनिटं राखीव ठेवून ते पुन्हा हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे निघतील.

हेही वाचा –  पुण्याच्या मध्य भागात रविवारी मिरवणुकीने नववर्षाचे स्वागत, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ ग्रामगुढीची उभारणी

दुपारी 12 वाजता पंढरपूरच्या जिल्हा मध्यवर्ती रोपवाटीका हेलिपॅडवर उतरल्यानंतर ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जातील. येथे तब्बल 1 तास 50 मिनिटांचा वेळ राखीव आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते नरसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणे येथे पोहोचतील. तिथे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात दर्शन घेऊन 1 तास थांबल्यानंतर दुपारी 3:20 वाजता नरसिंहपूर पोलीस स्टेशनचं उद्घाटन करतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने बारामती विमानतळाकडे प्रयाण करून दौरा संपेल. उद्या अमावास्या असल्याने या दौऱ्याला धार्मिक महत्त्व आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button