Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Breaking  News : ‘‘बांगलादेश अवैध तरीके से आया और कुदलवाड़ी में घर बसाया..!’’ कुदळवाडीत जोडपे जेरबंद! 

कुदळवाडीत बांगलादेशी नाहीत म्हणणाऱ्यांची बोलती अखेर बंद : बांगलादेशी महिला, आपत्य आणि शांतीदूत महोम्मद शेख ताब्यात

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : भारतात बेकादेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कुदळवाडी येथून एका दांम्पत्याला मुलासह ताब्यात घेतले आहे.  ‘‘रविरंजन काट्याजवळ देहु- आळंदी रोड, कुदळवाडी, चिखली येथे एक बांगलादेशी नागरिकत्व असलेले जोडपे थांबले आहे. त्यांचे सोबत एक मुलगा व एक बाळ आहे’’ अशी माहिती चिखली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. 

चिखली पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे अंमलदार व पंचांना सोबत घेऊन दि. 27/03/2025 रोजी रविरंजन वजन काट्याजवळ, देहू आळंदी रोड, कुदळवाडी येथे जाऊन खात्री करण्यात आली. त्यानंतर मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (वय-३३ वर्षे रा. पीसीएमसी शाळेशेजारी, तळवडे गावठाण, तळवडे पुणे, मुळ मक्दुलनगर, गोला अवादी, अलिगड, राज्य उत्तरप्रदेश) असे असल्याचे सांगुन त्याचे सोबत असलेली महिला ही त्याची पत्नी व मुले असल्याचे सांगितले. 

संबंधित महिलेचे नाव अकलिमा मोहम्मद राणा शेख (वय ३० वर्षे)  सदर तसेच तिचे १ वर्ष ३ महिन्यांचे एक बाळ आणि एक विधीसंघर्षित मुलगा आहे. त्यांना पोलिसांनी भारत देशाबाबत सामान्य प्रश्न विचारले असता, त्याची उत्तरे ते नीट देवु शकत नसल्याने ते भारताचे नागरिक नसल्याचा पोलिसांना संशय आला. त्यांनी मोहम्मद राणा शेख याची झडती घेतली असता त्याचे खिशात मोबाईल मिळून आला, मोबाईल ची पाहणी केली असता व्हाट्सअप मध्ये – 1.AKLIMA AKTER, 2.OBAYDULLA MOHAMMAD या दोन नावाचे PEOPLES REPUBLIC OF BANGLADESH या देशाचे  पासपोर्ट असून त्यावर Nationlity- Bangladeshi, पत्ता WEST DHARMAGANJ, FATULLAH ANAYET NAGAR 1421 NARAYANGANJ असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बांगलादेशी महिला प्रेमात पडली अन्‌ टुरिस्ट व्हीजावर आली! 

पोलीस तपासात  अकलिमा मोहम्मद राणा शेख हिने सांगितले की, “मी बांगलादेशची नागरिक असून, माझे यापूर्वी वसीम रईसुद्दीन बेपारी (मूळ गाव वेस्ट धरमगंज, फतुल्लाह अनायतनगर, नारायणगंज, देश- बांग्लादेश) याचेसोबत लग्न झाले होते. त्याचेपासून मला एक मुलगा आहे. मी सन २०१५ मध्ये माझे पती यांचेसोबत भारतामध्ये फिरण्यासाठी आले असता माझी मोहम्मद राणा शेख याचेशी ओळख झाली. त्यानंतर आम्ही बांग्लादेश येथे माघारी गेलो. त्यानंतर मोहम्मद राणा शेख व मी एकमेकांचे मोबाईलद्वारे संपर्कात होतो. त्यातुन पुढे आमचे प्रेम झाले व दि. २७/१२/२०२१ रोजी मी व मुलगा असे भारत देशाच्या ‘दुरिस्ट व्हिजा’वर विमानाने ढाका येथून कोलकत्तामार्गे मुंबई येथे आलो. तेथून आम्ही पुणे येथे आलो. त्यानंतर मी व मोहम्मद राणा शेख असे आम्ही लग्न केले व आता आम्हाला अब्दुल्ला वय १ वर्ष ३ महिने चा मुलगा आहे. व्हिसा ची मुदत संपली तरी आम्ही बांगलादेश येथे वापस गेलो नाहीत, अशी हकीकत संबंधित महिलेने पोलिसांना सांगितली आहे. तसेच, ही बाब कोणाला समजू नये, यासाठी मोहम्मद शेख याने तिचे पासपोर्ट जाळून टाकले. मात्र, त्यांच्याकडे भारताचे नागरिक असल्याचे आधारकार्ड आणि व्होटींग कार्ड आहेत, असे निदर्शनास आले आहे. 

राष्ट्र सुरक्षाबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस सतर्क… 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे , सह पोलिस आयुक्त  शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस हवालदार चेतन सावंत, बाबा गर्जे, भास्कर तारळकर, संतोष भालेराव, अमर कांबळे, कबीर पिंजारी, सुरज पवार, संतोष सकपाळ, संतोष भोर, नारायण सोमवंशी, सोनाली कातोरे, काजल तळेकर यांनी सदर कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. राष्ट्र सुरक्षाबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस सतर्क असून, अवैधरित्या भारतात वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा कायदेशीर बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे. 

हेही वाचा: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आमदारकी अडचणीत?

आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पुष्टी… 

कुदळवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतर ‘‘बांगलादेशी किंवा रोहिंग्या आढळले नाहीत’’ असा कांगावा करणाऱ्या कथित समाजसेवक आणि विशिष्ट समाजाच्या ठेकेदारांना सणसणीत चपराक बसावी, अशी ‘‘बुलडोझर ब्रेकिंग’’ कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पुष्टी मिळाली असून, कारवाईच्या आडून राजकीय फायदा उचलणाऱ्यांची बोलती बंद होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button