Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय; ८,००० कर्मचाऱ्यांची करणार कपात, कारण वाचून थक्क व्हाल

Meta Layoffs Mark Zuckerberg AI Jobs Cut: AI च्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील टेक कंपन्यांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. आता फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या Meta मध्येही बदल केले जात आहेत. कंपनी २० मे रोजी सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा निर्णय केवळ खर्च कमी करण्यासाठी नसून, कंपनीची भविष्यातील दिशा बदलण्याचा भाग असल्याचे संकेत CEO मार्क झुकरबर्ग यांनी दिले आहेत.वृत्त संकलन

अलीकडेच झालेल्या तिमाही निकालांच्या बैठकीत झुकरबर्ग यांनी स्पष्टपणे सांगितले की, Meta आता “छोट्या पण अत्यंत प्रभावी AI-powered टीम्स” तयार करण्यावर भर देत आहे. डझनभर इंजिनिअर्सचे काम AI च्या मदतीने एक-दोन कर्मचारी करु शकतात.

झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही टीम्स व्यवस्थित करत आहोत, म्हणजे गरजेपेक्षा मोठ्या टीम्स ठेवायच्या नाहीत.” म्हणजेच कंपनी कमी लोकांमध्ये अधिक काम करण्याच्या मॉडेलकडे वळत आहे. Meta चं लक्ष आता अशा कर्मचाऱ्यांवर आहे जे AI tools चा वापर करून कमी वेळेत मोठे प्रोजेक्ट्स पूर्ण करू शकतील.

दरम्यान, कंपनीची आर्थिक प्रमुख सुझान ली यांनीही स्पष्टपणे सांगितले की, AI इतक्या वेगाने बदलत असल्यामुळे Meta मध्ये नेमके किती कर्मचारी असावेत, याचं उत्तर कंपनीकडेही नाही. मात्र, AI वर होणारा खर्च झपाट्याने वाढत असल्यामुळे कर्मचारी संख्या नियंत्रणात ठेवणं आवश्य आहे.

हेही वाचा –  पुणे जिल्ह्यात टँकर पाणीपुरवठ्यासाठी OTP आधारित सॉफ्टवेअर प्रणाली लागू करण्याचे निर्देश

Meta यंदा डेटा सेंटर्स, कस्टम AI chips आणि मॉडेल ट्रेनिंगवर तब्बल १२५ ते १४५ अब्ज डॉलर खर्च करणार आहे. हा खर्च कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा खर्च मानला जात आहे. यामुळे कर्मचारी पगारांपेक्षा AI तंत्रज्ञानावर जास्त गुंतवणूक होत असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे, Meta मध्ये AI चा वापर फक्त कामासाठी नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठीही सुरू झाला आहे. कंपनीने “Model Capability Initiative” नावाचं एक टूल आणलं आहे. हे टूल कर्मचाऱ्यांचे keystrokes, mouse clicks आणि काम करण्याच्या पद्धतीवर नजर ठेवून AI agents ट्रेन करण्यासाठी डेटा गोळा करतं. इतकंच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमध्ये AI चा वापर किती केला, हेही पाहिलं जात आहे.

कंपनीत काही टीम्समध्ये एक मॅनेजर जवळपास ५० इंजिनिअर्स हाताळत असल्याचंही सांगितलं जात आहे. Meta याला internally “ultraflat structure” म्हणते. मात्र या बदलांमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, काही रिपोर्ट्सनुसार कर्मचाऱ्यांचे मनोबल सध्या कमी झाले आहे.

तरीही झुकरबर्ग यांनी AI माणसांची जागा घेईल, हा समज फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, AI लोकांना रिपलेस करणार नाही, तर त्यांच्या कामाची क्षमता अनेकपटींनी वाढवणार आहे. मात्र प्रत्यक्षात हजारो कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या निर्णयामुळे हा दावा कितपत खरा ठरतो, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

AI च्या युगात एकटाच कर्मचारी संपूर्ण टीमचं काम करू शकतो, असा विश्वास कंपनीचा असल्याने आगामी काळात टेक क्षेत्रात आणखी कर्मचारी कपात वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button