Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मंत्री आणि अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पाऊल

CM Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास, कामासाठीचे परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

याशिवाय राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती वाहनं, याचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं आहेत ती कमी केली जाणार आहेत. दुसरीकडे अनेक मंत्र्यांनी इलेक्ट्रीकल वाहन वापरण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याच आवाहन पंतप्रधान यांनी केल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय घेण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वी त्यांची कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता.

हेही वाचा –  मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय; ८,००० कर्मचाऱ्यांची करणार कपात, कारण वाचून थक्क व्हाल

मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनीही आपला ताफा निम्म्याने कमी केला आहे. त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष संरक्षण गटाला (SPG) तसे करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान मोदींनी आपला ताफा ५० टक्क्यांनी कमी केला आहे.

आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वडोदरा आणि गुवाहाटी दौऱ्यावर असताना पंतप्रधानांचा ताफा कमी करण्यात आला होता. ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे निर्देश एसपीजीला देण्यात आले आहेत, परंतु कोणतीही नवीन खरेदी केली जाणार नाही. याचीही खबरदारी घेण्यासाठी सांगितले असल्याचे म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button