Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, असा असणार मोदींचा शिर्डी दौरा

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२६ ऑक्टोंबर) शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. ते शिर्डी आणि अकोला या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदींची काकडी गावात जाहीर जनसभा होणार आहे.

तब्बल ५ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साई बाबाचे दर्शन घेणार आहेत. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

हेही वाचा – मराठा मोर्चाच्या तरूणांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा :

  • दुपारी १२.१५ वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल होणार.
  • दुपारी १ वाजता : श्री साईबाबा मंदिर आगमन, दर्शन, पूजा
  • दुपारी २ वाजता : प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या निळवंडे धरण जलपूजन
  • दुपारी ३.१५ वाजता : प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, यामध्ये सुमारे ७ हजार ५०० कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश.
  • सायंकाळी ७ वाजता : पंतप्रधान मोदी गोव्याला रवाना होणार.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button