Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“आईला संपव, तरच पत्नीला पाठवेन…”; सासूच्या सांगण्यावरून मुलानं जन्मदात्या आईला दिले विष

Son Poisons Mother | कौटुंबिक वादातून नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सासूने पत्नीला घरी नेण्याऐवजी आधी स्वतःच्या जन्मदात्या आईला संपवण्याची अजब आणि क्रूर अट घातली. सासूच्या या अघोरी सूचनेला बळी पडत, या नराधम मुलाने घरी येऊन आपल्या ६३ वर्षीय वृद्ध आईच्या जेवणात विष कालवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. या विषप्रयोगामुळे वृद्ध महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एका गावात राहणाऱ्या रवेंद्र नावाच्या आरोपीचा त्याच्या सख्ख्या भावाशी जमिनीवरून वाद सुरू आहे. घरात सतत होणाऱ्या या वादाला आणि भांडणांना कंटाळून रवेंद्रची पत्नी त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती.

सासूने घातली अघोरी अट

गेल्या ९ जुलै रोजी रवेंद्र आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी सासरी गेला होता. पत्नी आपल्यासोबत पुन्हा नांदायला येईल, अशी त्याला खात्री होती. मात्र, त्याची सासू फूलवती हिने पत्नीला पाठवण्यासाठी एक अतिशय क्रूर अट रवेंद्रसमोर ठेवली. सासूने स्पष्ट सांगितले, “जर तुला तुझ्या पत्नीला सोबत घेऊन जायचे असेल, तर आधी तुझ्या आईला रस्त्यातून बाजूला कर (संपव), तरच मी माझ्या मुलीला तुझ्यासोबत पाठवेन.”

हेही वाचा

रोहित अन् विराटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष; इंग्लंडविरुद्ध आज होणार ‘महामुकाबला’

आईच्या जेवणात मिसळले विष

सासूच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे अंध झालेल्या रवेंद्रने घरी परतताच स्वतःच्या जन्मदात्या आईला संपवण्याचा कट रचला. त्याने ६३ वर्षीय आई राम मूर्ती यांच्या जेवणात गुपचूप विष मिसळले. हे विषारी जेवण जेवल्यानंतर राम मूर्ती यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मुलगा गजाआड, सासूचा शोध सुरू

या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत कारवाई केली. सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव रंजन यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, वृद्ध महिलेवर विषप्रयोग केल्याप्रकरणी आरोपी मुलगा रवेंद्र याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यासाठी चिथावणी देणारी मुख्य सूत्रधार सासू फूलवती ही घटना उघडकीस आल्यापासून फरार झाली असून, पोलीस पथके तिचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button