breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा मोर्चाच्या तरूणांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून वकील गुणरत्न सदावर्तें यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. आज सकाळी ही घटना घडली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांमधील एका तरुणांचं नाव मंगेश साबळे आहे. हा तरुण फुलंब्री गावाचा सरपंच देखील आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी या तरुणाने त्याची गाडी देखील पेटवून दिली होती.

हेही वाचा – चिखलीसह समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा सक्षम!

गुणरत्न सदावर्ते यांनी मागच्या काही काळात मराठा आरक्षणाला विरोध केला होता, तशी वक्तव्यही त्यांनी केली होती. मराठा आरक्षणाला जेव्हा राज्य सरकारने मंजूरी दिली होती, तेव्हा सदावर्तेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांमध्ये सदावर्तेंबद्दल राग होता.

तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना आज मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केलं जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील ५० टक्के खुल्या जागा वाचवण्याचा आहे. या देशाला जातीपातीत तोडलं जाऊ नये यासाठी माझा लढा आहे, असं सदावर्ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button