Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Pimpri-Chinchwad Update : भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची बदनामी खपवून घेणार नाही : सरचिटणीस सचिन काळभोर

माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या राजीनाम्यानंतर अंतर्गत धूसफूस : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कारवाईच्या मागणीचे पत्र

पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू नये. या करिता राजकीय षडयंत्र रचले जात आहे. जगताप यांची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपाचे सरचिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे.

याबाबत सचिन काळभोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीतर्फे चिंचवड विधानसभा निवडणुकीत शहराध्यक्ष शंकर जगताप ह्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात येवू नये म्हणून माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षांच्या मनमानीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप केला आहे. तसेच, चिंचवडमधील १५ ते १६ माजी नगरसेवक राजीनामा देणार आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहे.

तातडीची बैठक घ्या आणि ‘त्यांना’ निलंबित करा…

तसेच, शंकर जगताप यांचे नेतृत्व जनतेच्या मनात शंका घेणारे असल्याचे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रिकामटेकडे यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू केले आहे. त्या संदर्भात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताबडतोब पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांची तातडीची बैठक घेऊन पक्षाच्या माझी नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी ह्यांच्या विरोधात पक्षाच्या वतीने निलंबनाची कारवाई करावी.

बावनकुळे, फडणवीस पाठबळ देत आहेत का?

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी व माजी नगरसेवक थेट भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करण्याऐवजी थेट सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध करुन शहरात पक्षांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्या संदर्भात ताबडतोब दखल घेऊन संबंधितांवर शिस्तभंग कारवाई करण्यात यावी. टिका-टिपण्णी करुन शंकर जगताप यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिक यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्या संदर्भात प्रदेशअध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठबळ देत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे, असा घणाघातही सचिन काळभोर यांनी केला आहे.

पक्ष देईल तो उमेदवार आम्ही निवडून आणणार..

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी ज्या उमेदवारांना प्राधान्य दिले. त्या उमेदवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी मनापासून काम करत असून पक्षाच्या वतीने कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत येत्या काळात तिन्ही उमेदवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. काही पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक यांनी फक्त चिंचवड विधानसभा निवडणुकीत येत्या काळात शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात येवू नये म्हणून सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध करुन शहरात पक्षांची बदनामी सुरू केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा शंकर जगताप यांच्या विषयी भविष्यातील बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असेही सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button