Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण
..तर चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदेतज्ज्ञांचा दावा

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचे राजकारण तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे. अशातच कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे.
महाराष्ट्रत सुरू असलेला सत्ता संघर्षचा निकाल अजून सर्व उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रामुख्याने १६ आमदारांच्या अपत्रते बाबत निर्णय येणाऱ्या १४ फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. आणि जर आमदार आपत्र ठरले तर विधानसभा बरखास्त होऊ शकते आणि असा जर झाला तर कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका बरखास्त होतील, असे विधान कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केले आहे.
कारण अत्ताची ही पोटनिवडणूक १४ व्या विधानसभेसाठी होणार आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल. त्यामुळे मग या निवडणुकांना काहीच अर्थ उरत नाही, असंही ते म्हणाले.





