Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘मन की बात’मधून मोदींनी दिली मोठी बातमी ; म्हणाले ‘भारतीय नौदलात INS ‘माहे…’

Mann ki Baat :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज त्यांच्या “मन की बात” कार्यक्रमाच्या १२८ व्या भागात देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी,” नोव्हेंबर महिना भारतासाठी अनेक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कामगिरीने भरलेला होता” असे म्हटले. “२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे देशाला लोकशाही मूल्यांची आठवण झाली” आसेतू पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी, “या महिन्यात वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात भव्य कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यांनी अयोध्येतील राम मंदिर संकुलात धर्मध्वज फडकवणे आणि कुरुक्षेत्रातील ज्योतिसार याठिकाणी  पंचजन्य स्मारकाचे उद्घाटन यासारख्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला.

पंतप्रधानांनी पुढे बोलताना, “हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या LEAP इंजिन MRO सुविधेचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे भारताला जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात एक नवीन पाय रोवता येईल. शिवाय, INS ‘माहे’ भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे सागरी सुरक्षा क्षमता आणखी वाढल्या” असे सांगितले.

हेही वाचा –  “२ तारखेला कमळाचं बटन दाबा”; भरसभेतून एकनाथ खडसेंचे आवाहन, नंतर चूक लक्षात आली अन्…नेमकं काय घडलं?

 मोदी अंतराळ क्षेत्राबद्दल काय म्हणाले?

अंतराळ क्षेत्राबद्दल बोलताना मोदींनी, “भारताच्या उदयोन्मुख अंतराळ परिसंस्थेला मोठी चालना मिळाली आहे. खाजगी कंपनी स्कायरूटच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’ने भारताची नवीन शक्ती आणि नवोपक्रम जगासमोर सादर केले आहेत. असे त्यांनी म्हटले. तसेच  “देशाच्या नवीन विचारसरणी, नवोपक्रम आणि युवाशक्तीमुळे हे यश शक्य झाले आहे” याचाही उल्ल्लेख त्यांनी यावेळी केला.

आयएनएस माहेभारतीय नौदलात दाखल

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आयएनएस ‘माहे’ मुंबईत भारतीय नौदलात दाखल करण्यात आले. काही लोक त्याच्या स्वदेशी डिझाइनने खूपच प्रभावित झाले. दरम्यान, पुडुचेरी आणि मलबार किनाऱ्यावरील लोक त्याच्या नावाने खूप आनंदित झाले. समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेल्या माहे या ठिकाणावरून त्याचे नाव ‘माहे’ ठेवण्यात आले आहे.

केरळ आणि तामिळनाडूमधील अनेक लोकांनी,”या युद्धनौकेचा शिखर उरुमी आणि कलारीपायाडूच्या पारंपारिक लवचिक तलवारीसारखा दिसतो” असे म्हटले. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपले नौदल वेगाने स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे.

GDP विषयी दिली माहिती

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “भारताने ३५७ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. “१० वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारतातील अन्नधान्य उत्पादनात १० कोटी टनांनी वाढ झाली आहे.” त्यासोबतच पुढे बोलताना मोदींनी पर्यटनाचा विषय काढला. त्यांनी पर्यटनाविषयी बोलताना,”या हंगामात उत्तराखंडमधील हिवाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करत आहे. औली, मुनस्यारी, चोपटा आणि देयारा ही ठिकाणे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. पिथोरागड जिल्ह्यातील १४,५०० फूटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या आदि कैलास येथे राज्यातील पहिली हाय अल्टिट्यूड अल्ट्रा रन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. देशातील १८ राज्यांतील ७५० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. पंतप्रधानांनी ही राज्याच्या पर्यटन आणि क्रीडा उपक्रमांसाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी म्हटले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button