Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

दिलजीत दोसांजच्या ‘सतलज’ चित्रपटावर बंदी; ‘झी ५’ वरून अचानक हटवला!

Satluj Movie | पंजाबमधील मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षमय आयुष्यावर आधारित ‘सतलज’ हा बहुचर्चित चित्रपट अखेर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ३ जुलै रोजी कोणत्याही पूर्वप्रसिद्धीशिवाय ‘झी ५’ (Zee5) या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट अवघ्या दोनच दिवसांत, म्हणजेच रविवारी प्लॅटफॉर्मवरून अचानक हटवण्यात आला. या कारवाईमुळे चित्रपटातील मुख्य अभिनेता दिलजीत दोसांजसह सिनेसृष्टीतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून सोशल मीडियावर यावरून नवा वाद पेटला आहे.

काय आहे जसवंत सिंह खालरा यांचा इतिहास?

पंजाबमध्ये १९८० ते १९९० या दशकात पोलिसांनी हजारो शीख तरुणांचे अपहरण करून त्यांना बनावट चकमकींमध्ये ठार मारल्याचा खळबळजनक दावा मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांनी केला होता. बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या हजारो तरुणांची माहिती त्यांनी पुराव्यासह उघड केली होती. या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या खालरा यांचेच पुढे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

त्यांच्या याच जीवनकार्यावर आधारित ‘पंजाब ९५’ हा चित्रपट गेल्या चार वर्षांपासून (२०२२ पासून) सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे नाव बदलण्यासोबतच तब्बल १२० कट्स सुचवले होते, जे निर्मात्यांना मान्य नव्हते. अखेर हाच चित्रपट नाव बदलून ‘सतलज’ या शीर्षकाखाली ओटीटीवर आणला गेला होता.

हेही वाचा

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना

केंद्र सरकारची भूमिका आणि कारवाईचे कारण

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट प्रदर्शन थेट सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारित येत नसले, तरी केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ‘माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१’ (IT Rules, 2021) अंतर्गत असलेल्या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. ‘सतलज’ चित्रपटाचे प्रदर्शन सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि वयोगटानुसार आशय वर्गीकरण (Age Classification) न केल्यामुळे थांबवण्यात आले आहे.

“हे अपेक्षितच होते…” – दिलजीत दोसांजची प्रतिक्रिया

चित्रपट अचानक हटवण्यात आल्यानंतर मुख्य अभिनेता दिलजीत दोसांज याने सोशल मीडियावरून आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी येणार किंवा तो हटवला जाणार हे आम्हाला आधीपासूनच अपेक्षित होते. कोणत्याही कायदेशीर मार्गाने चित्रपटाला चित्रपटगृहात परवानगी मिळत नसल्यानेच अखेर ओटीटीवर कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता तो रिलीज करावा लागला. त्यामुळे जेव्हा सरकारला याची कुणकुण लागेल, तेव्हा प्रदर्शन थांबवले जाणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती.”

या संवेदनशील विषयावरील चित्रपट अचानक डिजिटल प्लॅटफॉर्मवरून गायब झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रेक्षकांकडूनही यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button