Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना

गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

पुणे | माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकतें यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) तसेच पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात

शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा हरित वारी, स्वच्छता अभियान, अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button