Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नेमकं कारण काय?

Local Body Election :  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मात्र राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी करत काही जागेवरील निवडणूकीचा पुन्हा कार्यक्रम जाहीर केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपिल असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपिल असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येथील निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

धाराशिवमधील तीन प्रभागांची मतदान प्रक्रिया कधी

धाराशिव शहरातील न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या तीन प्रभागांची 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. धाराशिव शहरातील प्रभाग 2 अ 7 ब आणि 14 ब या प्रभागातील उमेदवारांवर आक्षेप घेतल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या तीन प्रभागातील जागांसाठी जिल्हाधिकारी चार डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत.

हेही वाचा –  ‘मन की बात’मधून मोदींनी दिली मोठी बातमी ; म्हणाले ‘भारतीय नौदलात INS ‘माहे…’

2 नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर

सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर आहे. फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या नगरपरिषदांमध्ये अर्ज छाननी बाबत काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना आपला नामनिर्देशित पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता चिन्ह वाटप केले. या नियमांचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत

दोन्ही नगरपालिकेचा सुधारित कार्यक्रम जाहीर

-4 डिसेंबर रोजी दोन नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

-नामनिर्देशित पत्र 10 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेण्याचा अवधी

-20 डिसेंबर रोजी मतदान

-21 डिसेंबर मतमोजणी

-23 डिसेंबर रोजी निकाल

दरम्यान, महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदाच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button