ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा अवघ्या 7 दिवसात यू टर्न का?

बँकेतील व्यवहार मराठीत व्हावेत यासाठी सुरू झालेलं आंदोलन मनसेने तूर्तास स्थगित

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांसह इतर अस्थापनांमध्ये मराठी भाषा सक्तीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलन देखील केलं. यावेळी काही ठिकाणी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना चोप देखील दिल्याचं बघायला मिळालं आहे. यावर टीका देखील करण्यात आली. त्यानंतर काहीच दिवसात हे आंदोलन थांबवण्यात देखील आलं आहे. त्यामुळे मनसेने यू टर्न घेतल्याची चर्चा रंगली आहे.

बँकेतील व्यवहार मराठीत व्हावेत यासाठी सुरू झालेलं आंदोलन मनसेने तूर्तास स्थगित केलं आहे. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेने हे आंदोलन सुरू केलं होतं. आता राज ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रा नंतर मनसैनिकांनी या आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिलेली आहे. अवघ्या 7 दिवसात मनसेने हा यूटर्न घेतल्याने राजकीय वर्तुळात मात्र आता चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना आंदोलन यशस्वी झालं तरी सुरूच ठेवायचं का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा –  ‘संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसचे विचार मांडायला सुरुवात केलीय’; मंत्री योगेश कदम यांचा टोला

दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मनसेने हे आंदोलन थांबवलं असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. तर आयएएस अधिकारी चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. मराठी भाषा अवगत असलीच पाहिजे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी मराठीतून व्यवहाराच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे वॉचमन, शिपाई, यांना मारून आंदोलनं होतात का? असं म्हणत संजय राऊत यांनी देखील मनसेला डिवचलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button