Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

#Breaking News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर अटक #Prashantkoratkar

जीवे मारण्याची धमकी: कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून तो फरार होता. तेलंगणातून कोल्हापूर पोलिसांनी त्याला आज (दि.२४) ताब्यात घेतले.

कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात कोल्हापूरसह नागपूरमध्येही गुन्हा दाखल झाला होता. तसेच महाराष्ट्रभरातून कोरटकर विरोधात संताप व्यक्त होत होता. अनेक व्यक्ती, संघटना, लोकप्रतिनिधींनी कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध करत त्याच्यावर तत्काळ कडक कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, कोरटकरने कोल्हापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने 11 मार्चपर्यंत त्याला दिलासा मिळाला होता. पण, कोल्हापुरातील सामाजिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी कोरटकर याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. त्यानंतर आणि त्यापुर्वीही कोल्हापूर पोलिसांनी नागपूरला धाव घेत कोरटकर याचा शोध सुरू केला होता. तथापि, त्याने सुरुवातीला मध्य प्रदेशात पळ काढल्याची चर्चा होती.

प्रशांत कोरटकर याच्या पलायनाची चर्चा…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोरटकर याने सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि त्यानंतर दुबईत पळ काढल्याची चर्चा होती. तथापि, त्यानंतर त्याच्या पत्नीनेच त्याचा पासपोर्ट जमा केल्यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतल्यानंतर आता त्याच्यावर काय कारवाई केली जाते, याची उत्सुकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button