Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठवाडा युवा मंच वर्धापन दिन,मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात

चिखली: मराठवाडा युवा मंच संस्थेचा १३ वा वर्धापन दिन आणि मराठवाडा मुक्ती दिन सोहळा उत्साहात पार पडला. चिखली येथील टाऊन हॉल सभागृहात येथे झालेल्या या सोहळ्यात संस्थेच्या वाटचालीसह मराठवाड्याच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त, वस्तू व सेवा कर उमाकांत बिराजदार, पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, महावितरणचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, एकनाथ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पैठणचे योगीराज महाराज पैठणकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमातून संस्थेच्या १३ वर्षांच्या यशस्वी व प्रेरणादायी कार्याची झलक मांडण्यात आली. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. तसेच दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

हेही वाचा –  ‘ग्रीन स्टील उद्योगांसाठी धोरण तयार करण्यात येणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी प्रधान आयुक्त, केंद्रीय सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि जीएसटी सुरेंद्रकुमार मानकोसकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तोरल इंडिया प्रा. लि. मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक भरत गित्ते यांना उद्योजक पुरस्कार, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालयचे अखिल घोगरे यांना प्रशासकीय पुरस्कार,इंद्रायणी विद्या मंदिरचे सहसंचालक डॉ. प्रा.एस. एन. पाटील यांना शैक्षणिक पुरस्कार, राजवीर हेल्थ सर्व्हिसेस प्रा. लि. डॉ. माधव चव्हाण वैद्यकीय पुरस्कार,ज्येष्ठ पत्रकार बंदेनवाज चौधरी यांना
पत्रकारिता पुरस्कार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कलाकार सुमंत शिंदे यांना कला पुरस्कार, ओम फ्लावर्सचे केशव त्रिभुवन यांना युवा गौरव पुरस्कार तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपायुक्त किरण काकडे यांना मराठवाडा मित्र विशेष सन्मान देण्यात आला.

मराठवाडा युवा मंच ही संस्था गेल्या १३ वर्षांपासून समाजासाठी विविध उपक्रम राबवत असून, युवांना एक सकारात्मक दिशा देण्याचे कार्य करत आहे. यापुढेही संस्था सामाजिक कार्याची वाटचाल अव्याहतपणे पुढे सुरू ठेवेल, असा विश्वास संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button