पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडीसह ३ नवीन महापालिका होणार; अजित पवारांची घोषणा

पुणे | उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी यावेळी चाकण आणि परिसरात महापालिका करावी लागणार असं वक्तव्य केलं.
अजित पवार म्हणाले, की चाकणमध्ये सध्या नगरपरिषद आहे, मात्र येथील विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेच्या क्षमतेवर मर्यादा येत आहेत. त्याचप्रमाणे हिंजवडी हे आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत आहे, पण तिथेही पायाभूत सुविधांच्या विकासाला बंधने येत आहेत. उरळी देवाची, मांजरी आणि फुरसुंगी या भागांमध्येही लोकसंख्येची वाढ आणि नागरी समस्यांचा डोंगर पाहता या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : मोदी,नड्डा ठरवणार एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार
ज्या भागाची लोकसंख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे, तिथे महानगरपालिका स्थापन करता येते. या निकषानुसार चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी या भागांसाठी नव्या महापालिका स्थापन केल्या जाणार आहेत. कोणाला आवडो वा न आवडो, हा निर्णय निश्चितपणे लागू होणार आहे, असं अजित पवार म्हणाले.





