ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिवजन्मोत्सव जल्लोषात

शिक्षण विश्व : ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक, विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणांनी परिसर शिवमय

पिंपरी-चिंचवड: भोसरी येथील Sant Sai English Medium High School मध्ये Chhatrapati Shivaji Maharaj यांचा शिवजन्मोत्सव सांस्कृतिक व धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांच्या मूर्ती व प्रतिमेचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता मशाल पेटवून करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढून परिसर शिवमय केला. लांडेवाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. “जय शिवाजी, जय भवानी” आणि “हर हर महादेव”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवीभाऊ लांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सौ. श्वेता नारायणगावकर यांनी केले.

विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अफजलखान वध, शाहिस्तेखानाचा कोथळा, “गड आला पण सिंह गेला” यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यरूपांतर प्रभावी ठरले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिवाजी महाराजांची भव्य प्रवेशिका व देशभक्तीपर गीत हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कु. आर्या गुरव हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर केली, तर अवनी हांडे हिने शौर्यगीत सादर केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाळणा, पोवाडे, शिवगर्जना आदी सादरीकरणांमधून रंगत वाढवली.

ओजस मांजरे (८ अ) याने प्रभावी शिवगर्जना सादर करताना शिवरायांचे नेतृत्वगुण, शौर्य व दूरदृष्टी यांवर भाष्य केले. “अधर्म जगी झाला पार”, “राज आलं राज आलं”, “पाळणा झुलवा बाल शिवाजीचा” यांसारखी गीते सादर करण्यात आली. भगव्या झेंड्यांनी सजलेल्या परिसरात शिवस्वराज्याची अनुभूती उपस्थितांना मिळाली.

प्रमुख अतिथी महापौर रवीभाऊ लांडगे यांनी विद्यार्थ्यांना देव, देश व धर्मनिष्ठा याविषयी मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांनी शिवरायांचे किमान पाच गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. “शिवरायांचे विचार वंदनीय असून त्यांचे आचरण प्रत्येकाने केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमास संचालिका सुनीता ढवळेश्वर, विश्वस्त पायल ढवळेश्वर, रूपाली खोल्लम, रिया पोतदार, मालन लिगाडे, सुहासिनी बडोले, संजय अनार्थे, मनोज वाबळे, अक्षय राणे, प्रमोद शिंदे, स्वाती मोघे यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वरूप कारले व अर्पिता मुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन उत्सवी जांभूळकर हिने केले. हा शिवजन्मोत्सव उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडून विद्यार्थ्यांना शिवरायांच्या प्रेरणादायी वारशाची जाणीव करून देणारा ठरला.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी देव, देश आणि धर्मनिष्ठा जपत शिवरायांचे शौर्य, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी हे गुण अंगीकारले तरच खऱ्या अर्थाने शिवजन्मोत्सव साजरा झाल्याचे समाधान मिळेल.”
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button