Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोदी,नड्डा ठरवणार एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी (एनडीए) कुणाला मैदानात उतरवणार याविषयी उत्सुकता आहे. तूर्त, एनडीएने उमेदवार निवडीचे सर्वांधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी एनडीएची बैठक झाली.

त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नड्डा, एनडीएमधील घटक पक्षांचे मंत्री आणि नेते सहभागी झाले. त्या बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडण्याचे सर्व अधिकार मोदी आणि नड्डा यांना देण्याविषयी मतैक्य झाले. मोदी हे लोकसभेतील, तर नड्डा राज्यसभेतील सभागृह नेते आहेत. बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर कुठली चर्चा झाली नाही.

हेही वाचा – ‘मनसे’साठी महाविकास आघाडी मैदानात; महापालिका भवनासमोर आंदोलन; नवीन राजकीय समीकरणाची चर्चा 

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार केवळ राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना आहे. त्या सभागृहांमधील संख्याबळ विचारात घेता एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित मानला जातो. याआधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण देऊन काही दिवसांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button