‘शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच’; अजित पवारांचं कोल्हेंना खुलं आव्हान

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अमोल कोल्हे खासदार असून ते शरद पवार गटात आहेत. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार निवडून आणून दाखवणारच असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार म्हणाले, पुण्यात संघर्ष यात्रा होत आहे. परंतु त्याच्यातील एका खासदारांने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर फार बरं झालं असतं. अमोल कोल्हे यांना निवडणुन आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केलं आहे. त्याला मी खासदारकी दिली आहे. काही दिवसापुर्वी अमोल कोल्हे राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आला होता. मधल्या काळात स्थानिक मतदारसंघात फिरले नाहीत. दुर्लक्ष केले. त्यांनी पुर्णपणे मला आणि वरिष्ठ नेत्यांना राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. एक कलावंत आहे. माझ्या करिअरवर परिणाम होत आहे. चित्रपट चालत नाहीत. याचा माझ्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो. अशाही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या.
हेही वाचा – Christmas Day : ख्रिसमस डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? जाणून घ्या..
निवडणुका जवळ आल्यामुळे कुणाला संघर्ष यात्रा सुचते, कुणाला पदयात्रा सुचते? त्यांना काय काढायचं ते काढून द्या. मी देखील त्यांच्या मतदारसंघात त्यांची खरी वस्तूस्थिती जनतेसमोर आणून दाखवणार, असं अजित पवार म्हणाले.
अमोल कोल्हे यांना उमेदवारी देतांना त्यावेळेस योग्य पद्धतीने उमेदवारी दिली होती. परंतु नंतरच्या काळात त्यांनी लोकांच्या प्रश्नांकडे दुलर्क्ष केले. निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम केलं पाहिजे? ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्हाला वाटलं की उत्तम वक्ते, कलाकार आहे. संभाजी महाराजांची भूमिका उत्तमपणाने बजावली आहे. त्या काळात मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला खिळवून ठेवण्याचे काम केले होते. त्यांचे हे प्लसपाईंट आहे. परंतु त्याठिकाणी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणार, असंही अजित पवारांनी म्हटलंय.





