Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

बारामती पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ६५०० मतांनी आघाडीवर

Sunetra Pawar leading in Baramati Bypoll Result : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले.

टपाली मतदान आणि मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे.

हेही वाचा –  ‘नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न’; मंत्री आदिती तटकरे

या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये बारामतीतीलच आठजण, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे.

बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. ते २०१९ मध्ये एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजयी झाले होते. अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. अजित पवार हे सलग आठवेळा बारामतीतून निवडून आले. त्यांपैकी तीन निवडणुकांमध्ये त्यांनी एक लाखांहून अधिक मतांनी विजय साकारला. २००९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रंजन तावरे यांच्यावर एक लाख दोन हजार ७९७ मताधिक्याने विजयी मिळविला. २०१९ मध्ये पडळकर यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केल्यावर २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव केला.आता बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button