Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अभिनेते विजय भाजपासोबत जाणार? भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांची ऑफर

Vijay Thalapathy | अत्यंत चुरशीच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू असतानाच, राजकीय हालचालींनी आतापासूनच वेग घेतला आहे. भारतीय जनता पार्टीने (भाजपा) अभिनेता विजय यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सीएनएन-न्यूज १८ च्या एका कार्यक्रमात तामिळनाडू भाजपाच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी एआयडीएमकेच्या नेतृत्त्वाखालील आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचल्यास, विजय यांनी एनडीए मध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे स्पष्ट केले.

यावेळी खुशबू यांनी वारंवार वियज यांचा उल्लेख “तांबी” (धाकटा भाऊ) असा उल्लेख केला, तर स्वतःला त्यांची “अक्का” (थोरली बहीण) असे संबोधले. युतीची शक्यता वर्तवली असता त्या म्हणाल्या, “याचा निर्णय माझ्या भावालाच घ्यावा लागेल, की त्याला आमच्यासोबत यायचे आहे की नाही.” त्याची बहीण किंवा ‘अक्का’ म्हणून, माझ्या मनात त्याच्याबद्दल अत्यंत आदर आणि स्नेह आहे. माझ्या धाकट्या भावासोबत माझ्या सदैव शुभेच्छा आहेत, परंतु माझी निष्ठा मात्र माझ्या पक्षाशी आहे.”

हेही वाचा

बारामती पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ६५०० मतांनी आघाडीवर

भाजपाने एक सन्मानजनक अंतर राखले आहे, यावर भर देत त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही विजय यांच्या विरोधात कधीच काही बोललो नाही. एनडीएचा भाग व्हायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांचा आहे. त्यांनी आपल्या पक्षाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. विजय यांच्यासाठी आमची दारे नेहमीच उघडी आहेत. जर त्यांना आमच्यासोबत यायचे असेल, तर त्यांचे स्वागत करण्यास आम्हाला मनापासून आनंदच होईल. हा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.”

विजय यांच्या प्रचंड लोकप्रियतेची दखल घेत असतानाच, खुशबू यांनी त्याच्या लोकप्रियतेचे रूपांतर प्रत्यक्ष निवडणुकीतील यशात होईलच असे नाही, याबद्दल सावधगिरीचा सूरही लावला. “विजय यांना प्रचंड जनसमर्थन लाभले आहे, यात शंकाच नाही आणि मी अभिमानाने सांगते की, आजच्या घडीला तामिळनाडूतील सर्वात मोठा ‘स्टार’ माझाच भाऊ आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button