ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘वेस्ट टू वंडर’स्पर्धा

PCMC : स्वच्छतेसोबत सौंदर्याला मिळतोय नवा आयाम

पिंपरी-चिंचवड | जागतिक पुनर्वापर दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांसाठी ‘वेस्ट टू वंडर’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत ३२ प्रभागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, शहर स्वच्छतेवर भर देतानाच वस्तूंचा सुयोग्य पुनर्वापर करून कलात्मकता जोपासण्याचा दुहेरी उद्देश या उपक्रमामागे आहे. टाकाऊ वस्तूंना नवसंजीवनी देत स्वच्छतेसोबत सौंदर्याची अनोखी सांगड घालण्याचा प्रयत्न यामधून करण्यात येत आहे.

या स्पर्धेमुळे संपूर्ण शहरात स्वच्छते बरोबर कलेचा आकर्षक व सर्जनशील आविष्कार पाहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातून टाकाऊ वस्तूंचे रूपांतर कल्पक कलाकृतींमध्ये करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे.

हेही वाचा      :              पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडीला दिलासा! 

स्पर्धे अंतर्गत कचरा संवेदनशील ठिकाणांचे नाविन्यपूर्ण व आकर्षक रूपांतर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सौंदर्यीकरण होऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची अंतिम मुदत २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.

लिंक : https://forms.gle/LsxTPH6axEaak4LW7⁠

वेस्ट टू वंडर हा विभागाचा हा उपक्रम शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि वसुंधरापूरक जीवनशैलीस चालना देणारा ठरेल, असा विश्वास सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी व्यक्त केला.

वेस्ट टू वंडर स्पर्धेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबरोबरच सर्जनशीलतेची जाणीव निर्माण होईल. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून शहर अधिक सुंदर आणि वसुंधरापूरक बनविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.

वेस्ट टू वंडर हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून, नागरिकांमध्ये वसुंधरापूरक सवयी रुजविण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर याबाबत जनजागृती वाढवून शहर अधिक स्वच्छ व शाश्वत करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button