Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एमआयटी महाविद्यालयात ‘AI and Innovation Sprints’ हॅकेथॉन उत्साहात

पिंपरी-चिंचवड : एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या Institution’s Innovation Council (IIC) च्या वतीने “AI and Innovation Sprints: Digital Transformation” या विषयावर हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्यभरातील १७ विविध महाविद्यालयांमधून एकूण ७८ संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी, IIC चे उपाध्यक्ष प्रा. अभिजीत नेटके तसेच IIC संयोजक डॉ. संदीप ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. कविता महाजन यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली. हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर करून विविध नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप सादर केले. स्पर्धेचे मूल्यांकन संतोष जगताप व अरुण आयनोडकर यांनी केले.

हेही वाचा –  श्रीमंतांच्या जगात भारताचा डंका! Forbes च्या यादीत नवीन 24 चेहरे, अंबानी-अदानीच नाही, ही नावं वाचून व्हाल दंग

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. भावेश परिहार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक दिग्विजय जाधव, तेजस जाधव व आदित्य जाधव यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक दिपक यादव व पवन राऊत यांनी मिळवला. अशा प्रकारच्या हॅकेथॉन स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना मिळून त्यांच्यातील संशोधन व तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ तंत्रज्ञान नसून भविष्यातील विकासाची किल्ली आहे. अशा हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळते. एमआयटी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशील विचारांना नेहमीच प्रोत्साहन देत राहील.

– डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button