ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“कॉफी विथ कमिशनर”

थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांनी साधला आयुक्तांशी संवाद

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘कॉफी विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिकेने महिला सबलीकरणासाठी सुरू केलेल्या थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिला आज सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही केंद्रातील महिलांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी संवाद साधला.

कोरोना महामारीमध्ये विधवा झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेने थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू केले आहे. तसेच भोसरी येथे महिला सबलीकरणाच्या उद्देशाने केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातील महिलांना थेट आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाजविकास अधिकारी संतोषी चौरगे, समुह संघटक वैशाली खरात, जयश्री पवळे, भोसरी शिलाई केंद्रातील रुपाली जोशी, शितल दरंदले, चैतन्या सावंत, सुषमा कडदेकर, रसमिता भोई, राणी शेळके, जयश्री कांबळे, मानसी कांबळे, अमृता काळे, स्वप्ना आढारी, थेरगाव शिलाई केंद्रातील स्मिता अंकुशे, मंगल लोंढे, सीमा चौधरी, सविता शिंदे, सत्यभामा उदमले, मीना चौधरी आदी उपस्थित होत्या.

हेही वाचा –  वाय.बी. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा !

आयुक्त सिंह यांनी सुरुवातीला महिलांना भोसरी व थेरगाव येथील केंद्रामध्ये काम करताना काही अडचणी येतात का, याबाबत माहिती घेतली. महिला सबलीकरणासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. आगामी काळात थेरगाव, भोसरी सारख्या केंद्रांना नियमित काम मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. ज्यामध्ये विविध संस्था, कंपन्यांचे गणवेश तयार करण्याचा देखील समावेश आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षण महिलांना देण्याचे नियोजन आहे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. यावेळी नवी दिशा उपक्रमामध्ये भविष्यातील संधी, आव्हाने आणि अनुभवांबद्दल आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत महिलांची सविस्तर चर्चा झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

कोरोना महामारीनंतर रोजगार नसल्याने आम्ही खचून गेलो होतो. पण महापालिकेच्या थेरगाव येथील प्रशिक्षण केंद्रामुळे आम्हाला खूप आधार मिळाला. आज आयुक्त यांची भेट घेतल्याने आम्हाला प्रत्यक्ष समस्या, अभिप्राय आणि सूचना त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली. आमच्या सूचनांवर नक्कीच विचार केला जाईल, याची खात्री आहे.

– मीना चौधरी, थेरगाव शिलाई केंद्र

महापालिका प्रशासनाच्या पाठिंबामुळे आम्हाला उत्साहाने काम करण्यास ऊर्जा मिळत आहे. आज आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. महिला सबलीकरणासाठी महापालिकेचे असणारे भविष्यातील नियोजन पाहून यापुढेही आमच्या पाठिशी उभी असल्याची खात्री पटली आहे.

– स्मिता अंकुशे, भोसरी शिलाई केंद्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button