ताज्या घडामोडीराष्ट्रिय

रशिया-युक्रेन मध्ये अणूयुद्ध?

रशियामध्ये ४००० किलोमीटर आत घुसून हल्ला : दोन्ही देश सूडाने पेटलेले !

मॉस्को / नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध काही संपण्याचे नाव घेत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे दोघेही सूडाने पेटले असून युद्धाचा शेवट हा अणुबॉम्बनेच होणार, असे मत आता जागतिक संरक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला..

युक्रेनने रविवारी रात्री रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. यामध्ये रशियाचे प्रचंड नुकसान झाले असून युक्रेनच्या आत्मघाती ड्रोन्सनी रशियाच्या वायुदलाची ४१ लढाऊ विमाने नष्ट केली, किंबहुना त्यांचा कोळसा केला. यातील एका विमानाची किंमत साधारण तीन हजार कोटी रुपये असल्याचे रशियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

युक्रेनने नाव दिले ‘ऑपरेशन वेब’!

युक्रेनच्या लष्कराने हाती घेतलेल्या या ‘ऑपरेशन वेब’ मध्ये रशियाच्या अतिमहागड्या विमानांचा कोळसा झाला आहे, एका विमानाची किंमत अंदाजे तीन हजार कोटी सांगितली जात आहे.

४००० हजार किलोमीटर आत घुसले !

या हल्ल्यात युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे चार हजार किलोमीटर आतमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा –  वाय.बी. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा !

रशिया-युक्रेन युद्ध निर्णायक टप्प्यावर..

गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात रविवारी एक निर्णायक घटना घडली. हे युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. युक्रेनकडून रशियन सैन्याच्या प्रमुख हवाई तळांवर ड्रोन्सनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रशियाचे अतोनात नुकसान झाले आहे. युक्रेनच्या आत्मघाती ड्रोन्सनी रशियाच्या वायूदलाची तब्बल ४१ लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. या हल्ल्यात रशियाची अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली सर्व विमाने नष्ट झाल्याचा दावा यु्क्रेनकडून केला जात आहे. त्यामुळे सूडाने पेटलेला रशियासुद्धा अणुयुद्ध करण्याच्या मन:स्थितीत आला आहे आणि युक्रेननेसुद्धा तशा प्रकारची जुळवाजुळव केली आहे.

रशियाची अपरिमित हानी..

या ड्रोनच्या हल्ल्यात रशियाची टीयू-९५, टीयू-२२ सारखी बॉम्बर्स विमाने आणि ए-५० ही महागडी हेर विमाने नष्ट झाली आहेत. रशियाकडे फक्त दहा ए-५० विमाने होती. मात्र, युक्रेनच्या या भयावह हल्ल्यात यापैकी काही विमाने नष्ट झाली आहेत. या प्रचंड हानीमुळे रशियन वायूदलाचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनचे खास ड्रोन्स..

युक्रेनने ड्रोन हल्ल्याच्या मोहिमेला ‘ऑपरेशन वेब’ असे नाव दिले होते. या हल्ल्यासाठी युक्रेनने ‘फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन’ चा वापर केला. युक्रेन गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखत होता. त्यासाठी सीमारेषेपासून तब्बल चार हजार किलोमीटर आतमध्ये तब्बल ४० ट्रक्समधून ११७ ड्रोन्स छताच्या लाकडी भागात लपवून रशियन सैन्याच्या हवाई तळापर्यंत नेण्यात आली. हे ट्रक्स रशियाच्या हवाई तळापर्यंत पोहचल्यानंतर ट्रकचे केबिन्स रिमोटने उघडण्यात आले. यामधून बाहेर पडलेल्या ड्रोन विमानांनी रशियाच्या इर्कुत्सक, इव्हानोव्हा, रायझान, आमूर आणि मर्मान्स्क या पाच प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. युक्रेनच्या ड्रोन्सकडून रशियन हवाई तळावरील बॉम्बर्स विमानांना लक्ष्य करण्यात आले.

रशियाला आणखी काही वर्षे लागतील..

रशियाने अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली बॉम्बर्स विमाने युक्रेनच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येणार नाहीत, याची काळजी घेतली होती. यासाठी ही विमाने रशियाच्या आतल्या भागात ठेवण्यात आली होती. मात्र, युक्रेनच्या ड्रोन्सनी या बॉम्बर्स विमानांना अचूकपणे लक्ष्य केले. त्यामुळे रशियाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ही लढाऊ विमाने पु्न्हा तयार करण्यासाठी आणि कार्यरत होण्यासाठी बराच अवधी जावा लागेल. त्यामुळे युक्रेनचा हा ड्रोन हल्ला रशियासाठी मोठा झटका मानला जात आहे.

सूडानी पेटलेले दोन्ही अध्यक्ष..

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे दोघेही सूडाने पेटले असून अमेरिकेसह कोणत्याही देशाची मध्यस्थी त्यांना मान्य नाही. हा बदला शेवटी अणुयुद्धामध्ये संपणार की काय? अशी शंका जागतिक पातळीवरील संरक्षण विषय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

युक्रेनचे दीड वर्षाचे प्लॅनिंग यशस्वी : झेलेन्स्की

या भीषण आणि भयानक हल्ल्याचे समर्थन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. आमच्या ११७ ड्रोन्सनी रशियाची ४१ लढाऊ विमाने केवळ उद्ध्वस्त केली नसून त्यांचा कोळसा केला आहे आणि यासाठी आम्ही दीड वर्षे प्लॅनिंग करत आहोत, असे झेलेन्स्की म्हणाले. याचबरोबर रशियाचे पाच हवाई तळही उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आमच्या ड्रोन्सचा खर्च केवळ ८.५ लाख डॉलर्स असून रशियाचे मात्र ७०० कोटी डॉलर्सचे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची ही विमाने बेचिराख झाली असून त्याचा लाईव्ह व्हीडिओ देखील रशियाला पोहोच झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button