वाय.बी. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा !
वाय बी पाटील पॉलिटेक्निकलला ''एनबीए''कडून मान्यता

डिप्लोमा इन कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या दोन अभ्यासक्रमांना मान्यता
पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथील वाय. बी. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या डिप्लोमा इन कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या दोन अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून (एनबीए) मान्यता मिळाली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड तसेच लगतच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शहरातच दोन्ही अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. या मान्यतेमुळे वाय.बी. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
एनबीए मान्यतेमुळे आकुर्डी येथील वाय.बी. पाटील पॉलिटेक्निकल संस्थेच्या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले असल्याचे डी. वाय. पाटील आकुर्डी संकुलाचे डायरेक्टर रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त), अध्यक्ष संजय डी. पाटील, सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, प्राचार्य डॉ. ए. एस. कोंडेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – ‘आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे’; शंभूराज देसाई
एनबीएकडून डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या दोन अभ्यासक्रमांना मान्यता म्हणजे वाय. बी. पॉलीटेक्निकल कॉलेजच्या प्रत्येक शिक्षकाचे आणि विद्यार्थ्यांचे कष्ट असून, या कष्टाचे हे यश आहे. या यशाने आम्हाला अधिक उंची गाठण्याची प्रेरणा मिळाली. असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यातून विद्यार्थ्यांना यशाची नवी क्षितिजे गाठण्यासाठी मदत होणार आहे. असे संस्थेने म्हटले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
वाय.बी. पॉलिटेक्निकल कॉलेज कॅम्पस हा गुणवत्ता, अत्याधुनिक जगाशी बरोबरी करण्यासाठी सर्व प्रकारची संसाधने आणि उच्च शिक्षण या त्रिसूत्री वर आधारित शिक्षणावर भर देत आहे.त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कॅम्पसने अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या प्लेसमेंट देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरल्यामुळे राष्ट्रीय मान्यता मंडळाने कॉलेज कॅम्पसच्या गुणवत्तेची पोचपावती दिली आहे. आगामी काळात शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करत अधिक मोठी उद्दिष्टे गाठण्यासाठी कॉलेज कॅम्पस सज्ज आहे.
– अमित विक्रम(निवृत्त) डायरेक्टर, रियर ऍडमिरल वाय. बी. पॉलीटेक्निकल कॉलेज