पाकचे घालीन लोटांगण, वंदीन भारताचे चरण ! प्रचंड घुमशानीनंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी !!
भारताच्या हल्ल्यांतून सोडवा हो sss ! पाकड्यांची अमेरिकेकडे धाव !

युद्धविराम !
भारताची ताकद दिसली ; दि. १२ तारखेला भारत सांगेल त्या अटींवर हतबल पाकडे स्वाक्षरी करणार !
नवी दिल्ली / इस्लामाबाद / वॉशिंग्टन : गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेली युद्धाची घुमशान अखेर शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावली. या काळात भारताची युद्धनीती, अचूकता आणि नियोजनबद्धता पाकड्यांच्या लक्षात आली.
भारताच्या सर्व अटी मान्य..
हे युद्ध म्हणजे भारताचे काहीही नुकसान होत नाही आणि फक्त पाकिस्तानचे कंबरडे मोडत आहे, विमाने कोसळत आहेत, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले जात आहेत, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त होत आहेत आणि भारताची ताकद एवढी आहे, की पाकिस्तान सोडून सर्व राजकीय नेत्यांना पळून जाण्याची वेळ आली आहे, हे लक्षात येताच पाकिस्तान सरकारने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना साकडे घातले. भारत सांगेल त्या अटींवर आम्ही शरण येण्यास तयार आहोत, फक्त युद्ध थांबवा, अशी त्यांनी मागणी केली. यानंतर ट्रम्प यांनी भारतीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ‘युद्धविराम’ जाहीर केला.
आता १२ तारखेला दुपारी फैसला !
प्रत्यक्षात, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार असून त्यात भारत ज्या अटी घालेल, त्या मान्य करण्याची तयारी पाकिस्तानने दाखवली आहे. त्यामुळे आता हा तात्पुरता युद्धविराम असून दि. १२ तारखेला अंतिम घोषणा करण्यात येईल.
भारताच्या अटी तरी काय ?
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार भारताने सर्वात मोठी अट ठेवली आहे ती म्हणजे कोणताही दहशतवादी हल्ला हा दोन्ही देशांमधील युद्ध समजले जाईल आणि त्याचा आम्ही नक्की बदला घेऊ, त्यावेळी कसलीही तक्रार चालणार नाही. त्याचप्रमाणे सिंधू जल करार पाळला जाणार नाही आणि आम्ही पाणी वापरणार, अशीही अट असेल.
पाकिस्तानला वाकवण्याची संधी..
युद्धाच्या निमित्ताने चारही बाजूंनी भारताने पाकिस्तानला पूर्णपणे चेपवले असून संपूर्णपणे गुडघ्यावर रांगण्याची वेळ त्यांच्यावर आणली आहे. भारत हा अत्यंत प्रगतिशील, शस्त्रसामग्रीने सज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला शेजारी असून त्याच्या जवळपासही पाकिस्तान पोहचणार नाही, याची खात्री पाकिस्तानला पटली आहे, त्यामुळे भारतापुढे लोटांगण घालण्याशिवाय त्यांना आता पर्याय राहिलेला नाही.
भारताने काय काय साधले..
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ हिंदूंची हत्या केली आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय लष्कराने पाकिस्तानवर चढाई केली. पहिल्याच दिवशी नऊ ठिकाणी यशस्वी हल्ला चढवून दहशतवाद्यांची मुख्यालये जमीनदोस्त केली. त्यावेळी, डझनभर ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी ठार मारले आणि एकूण ५०० फूट-सोल्जर ठोकले.
जुना हिशेब चुकवला..
कंदहारपासून जुन्या हल्ल्यांतील सूत्रधारांचे आणि दहशतवाद्यांचे जुने हिशोब चुकते केले. सिंधू जल करार इतिहासजमा झाला.
हेही वाचा – एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; “कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते कापावं लागतं, पाकिस्तानला….”
पाकची लक्तरे टांगणीवर..
या कारवाईदरम्यान पाकिस्तान सैन्याची अक्षरशः दाणादाण उडवली. त्यांच्या वायुदलाची इज्जत धुळीस मिळवली, तसेच चिनी एयर-डिफेन्स सिस्टीम, चिनी रडार, चिनी ड्रोन, चिनी मिसाईल्सची जागतिक पातळीवर नाचक्की करून टाकली.
युद्ध शत्रूच्या भूमीवर..
युद्धनीतीचा पहिला नियम भारताने पाळला. जवळजवळ संपूर्ण युद्धच पाकिस्तानच्या भूमीवर खेळलो, म्हणजे जे झाले ते नुकसान त्यांचेच झाले. पाक मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरला मजबूत नुकसान केले आणि भारताची युद्ध यंत्रणा जगात सर्वोत्तम आहे, हेही सर्वांना दाखवून दिले. मुख्यतः, चीनच्या ताकदीचा फुगा पण फुटला. भारतीय सेनेला आणि वायुसेनेला एकदम खराखुरा युद्धसराव करता आला. हा अनुभव प्रचंड उपयोगी पडणार आहे. आठ पाकिस्तानी वायुदलाची तळे उद्ध्वस्त केली.
पाकड्यांकडून युद्धबंदीची भीक
पाकिस्तानच्या डी जी एम ओ ने अमेरिकेला मध्यस्थी घालून सिझफायरची अक्षरशः भीक मागितली आणि अशी वेळ केवळ ७२ तासांत भारताने पाकिस्तानवर आणली.
पाकिस्तानचे नुकसान तरी किती ?
भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला कितपत महाग पडलं, याची मोजदाद पाकिस्तानात सुरू आहे पाकिस्तानचं किती नुकसान झालं, याचा आकडा आता पहिल्यांदाच समोर आला आहे. पाकिस्तानचे सात एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, यामध्ये पाच एअरबेस आणि दोन रडारचा समावेश आहे.यामध्ये नूर खान एअरबेस, रावळपिंडी एअरबेस, रहमियार खान, मुस्तफाबाद, मुरीद, रफीकुई एअरबेस यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमानांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अनेक ड्रोनचे लाँच पॅड देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या खर्चाचा पाकिस्तानला खड्डा सहन करावा लागला आहे.