Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

Zee Cine Awards : विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! ‘छावा’ने मारली बाजी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे…; वाचा विजेत्यांची यादी

Zee Cine Awards 2026 Winner List : मनोरंजन विश्वात महत्त्वाचा समजला जाणारा झी सिने अवॉर्ड्स पुरस्कार सोहळा नुकताच पार पाडला. या कार्यक्रमात बॉलीवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले होते. छावा, धुरंधर, केसरी २, तेरे इश्क मैं, जॉली LLB 3 या सिनेमांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं आतुरतेने लक्ष लागलं होतं. अखेर सोहळा पार पडल्यावर आता विजेत्यांची नावं समोर येऊ लागली आहेत.

Zee Cine Awards 2026 मध्ये लोकप्रिय अभिनेता ठरला आहे विकी कौशल. ‘छावा’साठी विकीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार जिंकल्यावर विकीने खास पोस्ट शेअर करत संपूर्ण ‘छावा’च्या टीमचे आभार मानले आहेत. याशिवाय या कार्यक्रमात विकीने दमदार परफॉर्मन्स सुद्धा सादर केला. तर, यावर्षी लोकप्रिय अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलाय नवोदित अभिनेत्री अनीत पड्डाने.

हेही वाचा –  राजमाता फार्मसी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आंतरराष्ट्रीय परिषद

विजेत्यांची नावं…

-सर्वोत्कृष्ट चित्रपट : छावा

-लोकप्रिय अभिनेता ( Viewer’s Choice ) : विकी कौशल – छावा

-लोकप्रिय अभिनेत्री ( Viewer’s Choice ) : अनीत पड्डा – सैयारा

-सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार – केसरी २

-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : क्रिती सेनॉन – तेरे इश्क मैं

-सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : वरुण धवन- सनी संस्कारी की तुलसी कुमारी

-सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : अहान पांडे – सैयारा

-सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : अनीत पड्डा – सैयारा

-सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : विनीत सिंह – छावा

-सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अनन्या पांडे – केसरी २

-सर्वोत्कृष्ट संवाद : मिलाप झवेरी – एक दीवाने की दीवानियत

सर्वोत्कृष्ट संगीत : सचेत परंपरा – सैयारा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ( ज्युरी ) क्रिती सेनॉनने जिंकला आहे. पण, नेटकऱ्यांनी या पुरस्काराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच कॅटेगरीत अभिनेत्री यामी गौतम सुद्धा नॉमिनेट होती. त्यामुळे यामी हा पुरस्कार डिझर्व्ह करत होती असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या याबाबतच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, Zee Cine Awards 2026 या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण लवकरच Zee 5 आणि झी टीव्हीवर करण्यात येईल. मार्च महिन्याच्या अखेरीस हा सोहळा टीव्हीवर प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button