Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“विजय यांचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही”; DMK नेत्याचा मोठा दावा

Vijay Thalapathy | तमिळनाडूमध्ये ऐतिहासिक सत्तांतर होऊन अभिनेते जोसेफ विजय यांचे सरकार स्थापन झाले असले, तरी राज्यातील राजकीय संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. ज्येष्ठ द्रमुक (DMK) नेते आणि तिरुचेंदूरचे आमदार अनिता राधाकृष्णन यांनी रविवारी मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “हे सरकार पुढील ६ महिनेही टिकणार नाही,” असा दावा करत त्यांनी, DMK प्रमुख एम. के. स्टॅलिन पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परततील, असा विश्वास व्यक्त केला.

दक्षिण तमिळनाडूमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राधाकृष्णन यांनी TVK चे ज्येष्ठ नेते आणि विल्लीवाक्कम् मतदारसंघाचे आमदार आधाव अर्जुन यांना थेट आव्हान दिले. राधाकृष्णन यांनी आमदार आधाव अर्जुन यांना आव्हान देत म्हटले की, “या सरकारचे आयुष्य आता फक्त ४ महिने उरले आहे. आधाव अर्जुन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मीही राजीनामा देतो. आम्ही तिरुचेंदूरमध्ये आमनेसामने लढू. हा आमचा बालेकिल्ला असून येथे आम्ही कोणाचाही पराभव करू शकतो.” दरम्यान, तिरुचेंदूर हा मतदारसंघ गेल्या २५ वर्षांपासून राधाकृष्णन यांचा बालेकिल्ला राहिला आहे.

हेही वाचा

‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत; RCC चे प्रमुख शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात!

गेल्या विधानसभा निवडणुकीत DMK चा बालेकिल्ला असलेल्या कोलाथूर मतदारसंघात एम. के. स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव झाला होता. DMK मधून TVK मध्ये गेलेल्या व्ही. एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला होता. यावर बोलताना राधाकृष्णन यांनी स्टॅलिन यांची पाठराखण करत मतदारांवरच अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली. ते म्हणाले, “स्टॅलिन यांनी कोलाथूरचा विकास सिंगापूरसारखा केला. पण तिथले मतदार ‘नालायक’ ठरले.” तसेच, “आमचे ‘थलायवर’ नेते स्टॅलिन यांनी आता त्रिचीमधून निवडणूक लढवावी. पुढील ४ ते ६ महिन्यांत ते पुन्हा मुख्यमंत्री होतील,” असा दावाही त्यांनी केला.

तमिळनाडूत ऐतिहासिक सत्तांतर

अभिनेते ते नेते बनलेल्या जोसेफ विजय यांच्या TVK पक्षाने गेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून त्यांनी DMK आणि AIADMK च्या ६२ वर्षांच्या सत्तेच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. बहुमतासाठी अवघ्या १० जागा कमी असताना, त्यांनी काँग्रेस, डावे पक्ष आणि VCK यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. हे तिन्ही पक्ष पूर्वी DMK चे मित्रपक्ष होते. त्यानंतर विधानसभेत १४४ विरुद्ध २२ मतांनी विजय यांनी विश्वासदर्शक ठरावही जिंकला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button